Baltimore Bridge Collapsed | जहाजाच्या ब्लॅक बॉक्समध्ये सापडला ऑडिओ, अपघातापूर्वी पायलटने दिला होता इशारा! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Baltimore  Bridge Collapsed | जहाजाच्या ब्लॅक बॉक्समध्ये सापडला ऑडिओ, अपघातापूर्वी पायलटने दिला होता इशारा! | Navarashtra (नवराष्ट्र)


दली या मालवाहू जहाजाच्या ब्लॅक बॉक्सच्या व्हॉयेज डेटा रेकॉर्डरमधून काही ऑडिओ फाइल्स सापडल्या आहेत. यात अपघातापूर्वी संभाषण आणि महत्त्वाचे तपशील समाविष्ट आहेत.

मंगळवारी रात्री 1.27 च्या सुमारास 984 फूट लांबीचे मालवाहू जहाज फ्रान्सिस स्कॉट की पुलावर (Baltimore Bridge Collapsed) धडकले. सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा पूल काही सेकंदातच पटापस्को नदीत बुडाला. पूल तुटल्यामुळे अनेक देशांचा बाल्टिमोर बंदराशी संपर्क तुटला. या अपघाताप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या अपघाताचा तपास करणाऱ्या टीमला एक महत्त्वाची गोष्ट सापडली आहे.  तटरक्षक दलाने मंगळवारी जहाजाच्या ब्लॅक बॉक्सच्या व्हीडीआरमधून ऑडिओ जप्त केला आहे. हा ऑडिओ NTSB अधिकाऱ्यांना देण्यात आला.

हे सुद्धा वाचा

कसा घडला अपघात?

अमेरिकेच्या मेरीलँड राज्यांतर्गत येणाऱ्या बाल्टिमोर शहरात मंगळवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील प्रसिद्ध फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजवर ‘डाली’ या मोठ्या कंटेनर जहाजाची पुलाला टक्कर झाली. यानंतर पूल तुटून पटापस्को नदीत पडला. या धडकेमुळे अनेक वाहने आणि लोकही नदीत पडले. डाली जहाज बाल्टिमोरहून श्रीलंकेची राजधानी कोलंबोसाठी रवाना झाले होते.






Source link