Thursday, August 20, 2026
Homeसातारावेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी ; सुमारे ८८४० रूपयांच्या मुद्देमाल जप्त : फलटण ग्रामीण...

वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी ; सुमारे ८८४० रूपयांच्या मुद्देमाल जप्त : फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई

फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून फलटण ग्रामीण पोलीसांनी बेकायदा दारू विक्री प्रकरणी एका दाम्पत्यासह चौघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ८८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे , यामध्ये देशी दाराच्या बाटल्यांसह पिंपरद येथील रोहित सिंकंदर भोसले व विडणी येथील दाम्पत्य सुशील सुरेश जगताप व वृषाली सुशील जगताप व अमित बाळासाहेब जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. २५ मार्च २०२४ रोजी पिंपरद, तालुका फलटण गावच्या हद्दीत आरोपी रोहित सिकंदर भोसले (वय २५, राहणार पिंपरद) हा बेकायदा देशी दारूची चोरटी विक्री करत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोलिसांनी देशी दारूच्या ४९ बाटल्यांसह एकूण १७१५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या ठिकाणी दि. २५ मार्च २०२४ रोजी विडणी (तालुका फलटण) गावचे हद्दीत कॅनल पुलाजवळील नाळे वस्ती येथे वृषाली सुशील जगताप व सुशील सुरेश जगताप हे दाम्पत्य आपल्या घराच्या आडोशाला स्वतःच्या आर्थिक फायदाकरीता देशी विदेशी दारूच्या बाटल्या बेकायदेशीरपणे जवळ बाळगून त्यांची लोकांना विक्री करून पैसे स्वीकारत असताना मिळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी दारूच्या २१ सीलबंद बाटल्यांसह एकूण १७३५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तिसऱ्या ठिकाणी दि. २५ मार्च २०२४ रोजी विडणी (तालुका फलटण) गावचे हद्दीत बौद्धनगर येथे असलेल्या घराच्या आडोशाला आरोपी अमित बाळू जगताप (राहणार विडणी) हा बेकायदा देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री करीत असताना मिळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे ५५९०/- रूपयांचा माल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments