Thursday, August 20, 2026
Homeसाताराउद्या बैठक माढयाबाबत राष्ट्रवादीची ; अजितदादा सोडविणार माढयाच्या तिढा?

उद्या बैठक माढयाबाबत राष्ट्रवादीची ; अजितदादा सोडविणार माढयाच्या तिढा?

फलटणः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघात तीन विद्यमान आमदार आहेत . त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती . त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघावर दावा पण केला होता

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत असणाऱ्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे बैठक आयोजित केली आहे . यामध्ये माढयाचा तिढा सोडवण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश येते की नाही ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागितली होती. परंतु महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवार घोषित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माढा लोकसभा मतदारसंघ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत असणारे मतभेद दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथे माढा लोकसभा मतदारसंघांमधील आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments