
hyderabad News : पत्नीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून हैदराबादमधील एका उत्पादन शुल्क न्यायाधीशाने टोकाचे पाऊल उचलले. या न्यायाधीशाने थेट गळफास लावून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या न्यायाधीशाचे नाव ए. माणिकांत असे असून, त्यांचे वय ३६ वर्षे आहे. हैद्राबादमधील राहत्या घरी त्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.








