
रिपोर्टनुसार १६ फेब्रुवारी २०२१ रोजी हा व्हिडिओ ‘नो वोट टू बीजेपी’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. त्यासोबत जे कॅप्शन लिहिले होते, त्यामध्ये म्हटले होते की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ही अपील करण्यात येत आहे. यामुळे स्पष्ट होते की, ही व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप नवीन नाही. २०२१ मध्ये बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात हा व्हिडिओ पहिल्यांदा समोर आला होता. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल केली जात असून म्हटलं जात आहे की, हे आवाहन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आहे. मात्र हा दावा पूर्णपणे असत्य आहे.








