
फलटणः फलटण येथे ४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये २५५ फलटण ( अ जा ) विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . स्वीप अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगामार्फत सर्व मतदारामध्ये मतदान जनजागृती साठी विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
दिनांक २७.०३.२०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता ठिकाण तहसील कार्यालयापासून रॅलीचा मार्ग महात्मा फुले चौक, गजानन चौक, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतीसिह नाना पाटिल चौक, पृथ्वी चौक, डीएड चौक, गिरवी नाका शेवटी तहसील कार्यालय येथे सांगता होणार आहे.
या रॅलीमध्ये फलटण शहरातील सर्व केद्रस्तरीय मतदान अधिकारी BLO, तसेच BLO पर्यवेक्षक सर्व सरकारी, अधिकारी कर्मचारी तसेच लायन्स क्लब सदस्य सहभागी होणार आहेत. सहायक निवडणुक निर्णय अधिकारी फलटण सचिन ढोले,तहसिलदार फलटण डॉ अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे.तसेच नोडल स्विप अधिकारी एस. के. कुंभार तसेच पथक प्रमुख शहाजी शिंदे तसेच स्वीप सहायक अधिकारी सचिन जाधव यांनी व स्वीपच्या नियोजन कक्षाच्या टिमच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे नियोजन केले आहे.






