फलटण येथे सिंचन भवन बांधण्याच्या प्रस्ताव आपण दिला होता : रणजितसिंह नाईक निंबाळकर

0
19
फलटण येथे सिंचन भवन बांधण्याच्या प्रस्ताव आपण दिला होता : रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते . या पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांना अगोदर सांगितले की मी कोणावरही टिका टिपण्णी करण्यासाठी ही पत्रकार परिषदे घेतलेली नाही . मी सहसा कोणा वरही टिका टिप्पणी  करत नाही . विकासावर बोलत असतो . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सांगितल की मागील पाच वर्षात आपण जे माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला वचन दिली होती त्या दिलेल्या वचनांची पूर्तता आपण केली आहे . फलटण तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या कामाची यादी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली .

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पत्रकार परिषदेत सांगितले की आचारसंहिता लागण्याच्या पूर्वसंध्येला २६०० कोटींच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत . फलटण तालुक्यातील फलटण बारामती रेल्वे मार्गासाठी १३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ,तसेच निरा देवघर बारामाही पाणी , निरा देवघर कालवाच्या काळज फलटण पासून माळशिरस पर्यतच्या कामासाठी ९६८ कोटी रुपये मंजूरी , आसू , राजाळे . फलटण निरगुडी गिरवी वारुगड रस्त्यासाठी २८६ कोटी रुपये मंजूर  होऊन कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे . फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी निंधी मंजूर केला आहे . फलटण सांगली रस्त्यांच्या कामाची मजूरी मिळवून निविदा काढण्यात आल्याचे सांगितले .

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की फलटण येथे सिंचन भवन बांधण्याच्या प्रस्ताव आपण दिला होता त्यावर सर्व विभागाची धोम बलकवडी – निरा देवधर वीर धरण योजना यासारख्या पाण्याच्या कोणत्याही योजना असो भविष्यात पाण्याचे सिंचन व्हावे यासाठी  पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन भवन तालुक्यात एकत्र यावे कृष्णा भीमा  योजना किंवा आपण राबवत असलेले कृष्णा डायव्हेक्शन यासारख्या योजना ऑफिस किंवा मुख्यालय हे फलटण तालुक्यात यावे , इंजिनिअर पासून एससी पर्यंत सर्व फलटणला बसावे .तसेच काल परवा पर्यंत या सर्व विभागाच्या एन ओ सी व सहमती मला येत होती .मला सांगताना आनंद होत आहे की काल मला या सर्व विभागाचे परवानगी एन ओ सी सर्वांनी दिले आहेत त्यामुळे फलटणमध्ये सिंचन भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे , त्यामुळे फलटण येथील कोळकी येथे एक चांगले एक्झिक्यूटिव्ह विश्रामगृह व सिंचन भवन बांधायचे आणि या ठिकाणी फलटण तालुक्यातील पाण्याची असो किंवा वीर धरणाचे पाण्याची नीरा उजवा कालव्याचे धूम -बलकवडी , निरा देवधर ,नीरा नदीच्या पाण्याची नियोजन करता यावे .

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण सांगली रस्ता फलटण दुधेबाबी , मोगराळे घाट दुरुस्त करून दहिवडी कातरखटाव मायणी पर्यंत ९१ किलोमीटरचा व १० मिटर रुंदियाचा कॉक्रिटचा रस्ता आहे  , सांगली पर्यंत जाणाऱ्या रस्तासाठी ११६ ५ कोटी रुपयांची मंजुरीची निविदा १५ मार्च २०२४ रोजी मिळालेली असून लवकरच काम सुरू होईल .
तसेच जातेगाव टेंभुर्णी रस्त्यासाठी १२३४ कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच काम सुरू होणार फलटणआदर्की रस्त्याचे काम सुरू आहे .फलटण उपळवे ताथवडा रस्त्याचे काम लवकर सुरू होईल .

फलटण शहरातील तारांगणाला  मंजूरी मिळाली आहे तसेच महिलांच्यासाठी डेक्कन चौक येते महिला जिम व योग सेंटर पुढील एक वर्षात चालू होणार आहे , मलठण येथील प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूल समोर जलतरण तलाव व जिम सुरू करण्यात येणार आहे तसेच काळुबाई मंदिर येथे पाण्याची १५० कोटी रुपयांची योजणा मंजूर करण्यात आली आहे , तसेच फलटण शहरात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाले सेशन कोर्ट चालू झाले आहे साखरवाडी येथे तहसील कार्यालय चालू होण्याचा मार्गावर आहे तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्या प्रयत्न याठिकाणी आहे . .

या सर्व कामांसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा तसेच नितिन गडकरी यांचे आभार मानले आहेत व महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे ही आभार मानले आहेत . आभार मानताना त्यांनी सांगितले की या सर्वांना विकास कामासाठी लागणार निधी कधीही कमी पडू दिला नाही