Thursday, August 27, 2026
Homeसातारानियमबाह्य रीतीने वाहने चालवणाऱ्या विरोधात कारवाई सूरू करण्यात आली आहे

नियमबाह्य रीतीने वाहने चालवणाऱ्या विरोधात कारवाई सूरू करण्यात आली आहे

फलटण :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात वाह तपासणी करण्यासाठी तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी , जीवितहानी वाचविण्यासाठी संभाव्य अपघात टाळण्यासाठी नियमबाह्य रीतीने वाहने चालवणाऱ्या विरोधात कारवाई सूरू करण्यात आली आहे

फलटण शहरातील गुन्ह्यांच्या आढाव घेत असताना असे दिसून आले आहे की अनेक गुन्ह्यामध्ये वाहनांचा वापर झाल्याचे निदर्शनास येत आहे . फलटण शहरात अनेक दुचाकी वाहनांवरून तीन किंव जास्त व्यक्ती प्रवास करीत असल्याचे दिसू येत आहे , वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे किंवा ती व्यवस्थित दिसत नसल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत . तसेच फलटण शहरात आतापर्यंत ६ दुचाकी वाहने चोरीस गेल्याबाबत शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

१७ मार्च २०२४ रोजी फलटण शहरातील बारामती पूल येथे सायंकाळी आणि दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी सातारा पूल येथे नाकाबंदीचे आयोजन केले होते. या नाकाबंदीवेळी ४० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही गुन्हे प्रतिबंधासाठी फलटण शहर पोलिसांतर्फे नाकाबंदी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments