
मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत
- सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- त्यानंतर Form6 वर जाऊन Apply online for registration of new voter ID वर क्लिक करा.
- पुढे New User पर्यायावर क्लिक करा आणि तिथे तुमचे नाव, वय आणि लिंग इत्यादी माहिती सबमिट करा.
- त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल.
- मग तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरिफाय करू शकतील.
- संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- यानंतर तुमच्या फोन आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक अॅप्लिकेशन नंबर प्राप्त होईल.
- या नंबरचा उपयोग मतदान ओळखपत्राचे स्टेट्स चेक करण्यासाठी होईल.
- या संपूर्ण प्रक्रियेनंतर मतदान ओळखपत्र डाउनलोड करावे.
लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार आहे. तर, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. पहिल्या टप्पा- १९ एप्रिल २०२४, दुसरा टप्पा- २६ एप्रिल २०२४, तिसरा टप्पा- ७ मे २०२४, चौथ्या टप्पा- १३ मे २०२४, पाचवा टप्पा- २० मे २०२४, सहावा टप्पा- २५ मे २०२४ आणि सातव्या टप्प्यासाठी १ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.








