तहसील कार्यालयाला तांत्रिक मंजुरी;आचारसंहिता लागण्याच्या पूर्वसंध्येला मतदारसंघात २६०० कोटी रुपये ची कामे मंजूर करून मतदारसंघात निधींचा पाऊस : रणजितसिंह

0
51
तहसील कार्यालयाला तांत्रिक मंजुरी;आचारसंहिता लागण्याच्या पूर्वसंध्येला मतदारसंघात २६०० कोटी रुपये ची कामे मंजूर करून मतदारसंघात निधींचा पाऊस : रणजितसिंह

साखरवाडी येथे अतिरिक्त तहसील कार्यालयाला तांत्रिक मंजुरी

फलटण – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी ही मतदारसंघात निधींचा पाऊस; आचारसंहिता लागण्याच्या पूर्वसंध्येला २६०० कोटींच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध तसेच साखरवाडी येथे अतिरिक्त तहसील कार्यालयाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पहिल्या टर्मच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी फलटण तालुक्यातील फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी १३०० कोटी रुपयेच्या मंजूर कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. निरा-देवघर कालव्याच्या काळज, फलटण पासून माळशिरस पर्यंतच्या कामासाठी ९६८ कोटी रुपये मंजूरीच्या कामाची आज निविदा प्रसिद्ध झाली. आसू-राजाळे-फलटण-निरगुडी-गिरवी-वारुगड रस्त्यासाठी २८६ कोटी रुपये मंजूर होऊन कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. फलटण नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १५.४५ कोटी रुपये मंजूर करून कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वसंध्येला मतदारसंघात २६०० कोटी रुपये ची कामे मंजूर करून मतदारसंघात निधींचा पाऊस पडला आहे. आज सर्व कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्याला मिळालेल्या खासदार पदाचा उपयोग मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी करत असताना आपल्या कार्यकाळात मतदारसंघात हजारो कोटींचा निधी मंजूर करून आणला व मतदारसंघाला विकास काय असतो हे दाखवून दिले. – डॉ प्रवीण आगवणे (सदस्य दिशा समिती)

र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या न साखरवाडी साठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची तांत्रिक मान्यता मिळाली असून अंतिम मान्यता लवकरच मिळणार आहे. साखरवाडी (तालुका फलटण) येथील सर्वसामान्य