Thursday, August 27, 2026
Homeसाताराउपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या " जिद्द "...

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या ” जिद्द ” या बंगल्यावर आले होते.

फलटण : फलटण येथील सुभाष शिंदे यांचा ” जिद्द ” बंगला गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला असून गेल्या २५-३० वर्षात या बंगल्यावर राज्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी शिंदे यांना भेटत असल्याच्या आठवणी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भेटीने ताज्या झाल्या असल्याची सांगितले

फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या ” जिद्द ” या बंगल्यावर आले होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की सुभाषराव शिंदे पहिल्यापासूनच आमच्याबरोबर राजकारणात होते. फलटणमधून त्यांनी फार मोठे आम्हाला सहकार्य केले असून ते कायम स्मरणात राहणार आहे. फलटण तालुक्याच्या राजकीय पटलावरील ते एक धाडसी, निर्भय, आक्रमक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने आम्हालाही अतीव दुःख होत आहे. सुभाषराव शिंदे यांचा आम्हाला असणारा राजकीय, सामाजिक सहकार्य व मनापासूनचा पाठिंबा कधीही विसणार नसून शिंदे कुटुंबीयांची आम्ही यापुढे काळजी घेणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शिंदे परिवाराच्या सांत्वनानंतर खासदार रणजितसिंह आणि अजितदादा यांच्यात गुफ्तगू सुरु झाली. त्या दोघांमध्ये काय बोलणे सुरु होते हे स्पष्ट झाले नसले तरी साखर कारखान्याचा प्रश्न, लोकसभा निवडणूक, आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या सद्य परिस्थितीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजत आहे. यावेळी आ .दत्तामामा भरणे व आ . दिपक चव्हाण हे पण उपस्थिती होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments