Thursday, August 27, 2026
Homeसाताराफलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन : रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार...

फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन : रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांच्या हस्ते

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ( RTO )  उद्घाटन समारंभात बोलत होते . सामान्य जनतेल्या दिलेल्या प्रत्येक शब्दाची वचनपूर्ती आपल्या पाठिंबामुळे विशेषत जयकुमार गोरे यांच्यामुळे केली . तालुक्यातील अनेक मोठी कामे मार्गी लावण्यात आली आहेत . आज आर टी ओ कार्यालयाचे उद्धाटन झाले आहे . अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू झाले असून , निरा देवघर उजवा कालवा , धोम बलकवडी बारमाही , फलटण – बारामती व फलटण – पंढरपूर रेल्वे मतदार संघात विविध रस्ते , एम आय डी सी या सर्व कामामध्ये यश आले आहे . येणार काळात अतिरिक्त तहसिल कार्यालय व अतिरिक्त जिल्हा पोलीस कार्यालयही काही दिवसात होणार असल्याचे सांगितले . पुढे बोलतात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की विकासकामात मी कमी पडणार नाही ना या अगोदर कमी पडलो नाही . भाजपने मला पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याची संधी दिली असल्याचे सांगत या संधीसाठी मला सहकार्य करा आणि पुन्हा विकासाची जास्तीची कामे करण्यासाठी मला संसदेत पाठवा असे आवाहन यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.

यावेळी माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे , उत्तमराव जानकर , प्रल्हादराव साळुंखे पाटील , आर टी ओ कार्यालयातील अधिकारी चव्हाण , म्हेत्रे , नगरपालिका मुख्याधिकारी कोंडे पाटील यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, फलटण एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे खासदारांकडून दोन्ही तालुक्यात विकासकामात दुजाभाव केला जात नाही. गेल्या 30 वर्षात फलटण-माणमध्ये जे झाले नाही ते आम्ही दोघांनी केले आहे. विकास काय असतो हे भाजप सरकारने दाखवून दिले आहे. विकासप्रक्रिया यापुढे अशीच वेगाने चालविण्यासाठी भाजपने पुन्हा खासदारांना उमेदवारी दिली आहे. योग्य माणूस दिल्यानंतर काय घडते हे सर्वांनी पाहिले असून आगामी काळात या भागात आश्चर्यकारक बदल होणार होणार आहेत.

प्रारंभी आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन खासदार नाईक- निंबाळकर, आमदार गोरे यांच्याहस्ते झाल्यानंतर संपूर्ण कार्यालयाची त्यांनी पाहणी केली. प्रशासन अधिकारी कार्य तत्परतेबद्दल अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी फलटण न्यायालयातील 35 वकिलांची नोटरी पदावर निवड झाल्यामुळे त्या सर्व वकिलांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक चव्हाण यांनी केले. आभार म्हेत्रे यांनी मानले. कार्यक्रमास बोरावके हिरोच्या प्रमुख सौ. बोरावके, अरिहंत ऑटोमोबाईलचे प्रमुख मंगेशशेठ दोषी, धनंजय साळुंखे- पाटील, सुधीर ढेंबरे, अमोल सस्ते, बजरंग गावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आरटीओ एजंट, वकील, डॉक्टर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments