
निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत समावेश असणाऱ्या अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, कमेटीमध्ये सरकारचे प्रतिनिधी बहुमतात आहेत. मी काहीही म्हटले तरी सरकारला जे पाहिजे तसेच होईल. अरुण गोयल यांच्या नियुक्तीवेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, त्यांची नियुक्ती विद्युत वेगाने झाली आहे. आणि ते त्याच वेगाने पायउतारही झाले. अधीर रंजन चौधरी यांनी दोन्ही नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या नावांची घोषणा करताना म्हटले की, मी या निवडीवर असहमती व्यक्त केली आहे. तसेच निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.








