Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | काँग्रेस-तृणमूलचं काय जमेना; तुराच्या जागेवर ममता बॅनर्जी संगमांना उतरवणार...

Political News | काँग्रेस-तृणमूलचं काय जमेना; तुराच्या जागेवर ममता बॅनर्जी संगमांना उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात… | Navarashtra (नवराष्ट्र)

Political News | काँग्रेस-तृणमूलचं काय जमेना; तुराच्या जागेवर ममता बॅनर्जी संगमांना उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

काँग्रेस-तृणमूलचं काय जमेना; तुराच्या जागेवर ममता बॅनर्जी संगमांना उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात…

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील मतभेद संपताना दिसत नाहीत. बंगालनंतर आता मेघालयातील तुरा लोकसभेसाठी तसेच आसामच्या जागांसाठी उमेदवार जाहीर करणार आहे. लवकरच तिकीट जाहीर होईल, असा दावा केला जात आहे.

कोलकाता : काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील मतभेद संपताना दिसत नाहीत. बंगालनंतर आता मेघालयातील तुरा लोकसभेसाठी तसेच आसामच्या जागांसाठी उमेदवार जाहीर करणार आहे. लवकरच तिकीट जाहीर होईल, असा दावा केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राज्यात पक्ष काँग्रेसपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. म्हणजे काँग्रेससोबत युती न करण्याची योजना त्यांनी आखली आहे. इंडिया आघाडीसाठी हा पुन्हा एकदा धक्का मानला जाणार आहे. मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारी मिळू शकते. येथून काँग्रेसने यापूर्वीच ए. संगमा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
यापूर्वी काँग्रेसने बंगालमध्ये युतीसाठी तृणमूलसाठी तुरा जागा सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. परंतु, पश्चिम बंगालमध्ये युती करण्यावर दोघांचे एकमत होऊ शकले नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments