Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेश‘वाघाने जबड्यात पकडलं होतं डोकं, मी त्याची जीभ ओढली’, १७ वर्षीय मुलाची...

‘वाघाने जबड्यात पकडलं होतं डोकं, मी त्याची जीभ ओढली’, १७ वर्षीय मुलाची मृत्यूवर मात

‘वाघाने जबड्यात पकडलं होतं डोकं, मी त्याची जीभ ओढली’, १७ वर्षीय मुलाची मृत्यूवर मात

[ad_1]

अंकितने सांगितले की, तो उत्तराखंड राज्यातील रामपूरमधील रहिवासी आहे. तो १० वीच्या वर्गात शिकतो. २ नोव्हेंबर २०२३ रोजी तो नेहमीप्रमाणे शाळेतून घरी पायी येत होता. तेव्हा रस्त्यात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्याची मान वाघाने पकडली होती. वाघाने अंकितचे डोके आपल्या जबड्यात पकडल्यानंतर संधी मिळताने अंकितने वाघाची जीभ पकडली व जोरात ओढली. जवळपास १५ मिनिटे चाललेल्या संघर्षानंतर वाघ मागे हटला व अंकितला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून जंगलात पळून गेला. या हल्ल्यात त्याचा चेहरा, मान, कवटी आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अंकितने सांगितले की, त्याच्यासोबत जात असलेल्या व्यक्तीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र अंकितने मृत्यूशी संघर्ष करून अनेक लोकांचा जीव वाचवला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments