
सध्या लग्नाचा सीझन सुरू असून या निमित्ताने पाहुणे व नातेवाईक नव वधू वरांना विविध भेटवस्तू देत असतात. कोणी सोन्याचे दागिने देत असतो तर कोणी कपडे व भांडी. अनेकदा असे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत, त्यामध्ये वधू-वराचे मित्र गंमत म्हणून लाटणे, झाड़ू, डायपर आदि वस्तू देताना दिसतात. मात्र मध्य प्रदेश राज्यातील छतरपूरमध्ये एका दिराने आपल्या नवीन वहिनीला असे काही भेटवस्तू दिली की, यामुळे वहिनीसह संपूर्ण कुटूंब संकटात सापडले.