Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशViral Video | अबब! पाकिस्तानने फक्त एकाच बाजूने छापल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल...

Viral Video | अबब! पाकिस्तानने फक्त एकाच बाजूने छापल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

Viral Video | अबब! पाकिस्तानने फक्त एकाच बाजूने छापल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अबब! पाकिस्तानने फक्त एकाच बाजूने छापल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

स्टेट बँक ऑफ पाकिस्तान यांनी छापलेल्या चूकीच्या नोटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधीच दिवाळं निघालेल्या पाकिस्तानामध्ये नोटा छापण्यात घोड चूक आढळून आली आहे. नोटा फक्त एकाच बाजूने छापल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ यांनी छापलेल्या चूकीच्या नोटांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानची अर्थिक परिस्थिती जगजाहीर आहे. धान्य आणि अन्नासाठी मोठ्या रांगा लावल्या जात आहेत. पैशाची कमी असताना पाकिस्तानामध्ये फक्त एकाच बाजूने छापलेल्या नोटा समोर आल्या आहेत. ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ने जारी केलेल्या काही नोटा एकाच बाजूने छापलेल्या असून दुसऱ्या बाजूने कोऱ्या आहेत. या सदोष नोटा लोकांच्या हातात आल्याने खळबळ उडाली आहे. या नोटा परत करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली आहे. या अर्धवट नोटाचा व्हिडिओ बँकेतील एका कर्मचाऱ्यानेच तयार केला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments