Thursday, August 27, 2026
Homeसाताराराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावान नेते : सुभाष शिंदे यांचे दुःखद...

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावान नेते : सुभाष शिंदे यांचे दुःखद निधन

फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकार्य सुभाषराव शिंदे यांचे नुकतेच पुणे येथे निधन झाले आहे. उद्या उद्या दि. १४ मार्च रोजी सकाळी फलटण येथील “जिद्द” या निवासस्थानी सकाळी 8 ते 10 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यानंतर सकाळी 11 वाजता शिंदेवाडी येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहेत

सुभाषराव शिंदे हे ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, ६ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फेब्रुवारी महिन्यात सुभाषराव शिंदे यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने, फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती आणखी बिघडू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटल मध्ये दाखल आले. आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments