Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारसाला दिली भेटी, काशी...

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारसाला दिली भेटी, काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन केली पूजा! | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Narendra Modi  | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारसाला दिली भेटी, काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन केली पूजा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने राज्यांचे दौरे करत आहेत. आठवडाभरात ते दुसऱ्यांदा शनिवारी पश्चिम बंगालला पोहोचले.

येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचं  (Loksabha Election) बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naremdra Modi) सातत्याने राज्यांचे दौरे करत आहेत. गेले दोन दिवस ते ईशान्ये कडील राज्याच्या दौऱ्यावर होते. शनिवारी पश्चिम बंगालला मधील सिलीगुडीलाही त्यांनी भेट दिली.त्यानंतर ते आता बनारसला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या लोकसभा मतदारसंघात काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. येथे त्यांनी बाबा विश्वनाथ यांना अभिषेक केला. पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान मोदी बनारसमध्ये पोहोचले आणि ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. बाबतपूर विमानतळ ते काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी पीएम मोदींच्या स्वागताच्या घोषणा दिल्या. उत्साही लोक मोदी-मोदी आणि हर हर महादेवच्या घोषणा देत होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments