Friday, August 14, 2026
Homeसातारामाढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाले नाही; तर पदाधिकारी व...

माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाले नाही; तर पदाधिकारी व तळागाळातील कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही : रामराजे नाईक निंबाळकर

फलटण :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल,प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन आमदार असून माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळाला पाहिजे; अशी आग्रही मागणी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. जर माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाले नाही; तर पदाधिकारी व तळागाळातील कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही; असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments