Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रsharad pawar : ..यामुळे शरद पवारांना ‘नमो महा रोजगार’ मेळाव्याचे निमंत्रण नाही;...

sharad pawar : ..यामुळे शरद पवारांना ‘नमो महा रोजगार’ मेळाव्याचे निमंत्रण नाही; मात्र आता निमंत्रण पत्रिकाच बदलली!

[ad_1]

या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार,  सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शासकीय कार्यक्रमासाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न दिल्याने तसेच कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव न घातल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments