Sunday, August 30, 2026
Homeब्लॉगपितळखोरा लेणीत सापडलेल्या स्त्री शिल्प " गजलक्ष्मीचे "नाही ; सुरज जगताप

पितळखोरा लेणीत सापडलेल्या स्त्री शिल्प ” गजलक्ष्मीचे “नाही ; सुरज जगताप

बघा असं आहे…!

झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही त्या उक्तीनुसार मुंबई मधील छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयाचे प्रशासन कसे कारभार करतो याचा मूर्तिमंत उदाहरण.

दोन महिन्यापूर्वी समाजातील जागृत धम्म बांधव आणि मी आम्ही सर्व मिळून छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयातून प्रदर्शित केलेल्या पितळखोरा लेणीत सापडलेल्या स्त्री शिल्पाच्या खाली चुकीची माहीती प्रसिद्ध केली गेली आहे व त्या आधारावर चुकीची माहीती देणारा विडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला होता त्याची तक्रार आम्ही समाजाच्या वतीने केली होती, त्याला वस्तुसंग्रहालयाने कोणताच प्रतीसाद न दिल्याने तब्बल एक महिन्यानंतर पुन्हा ईमेलवरून त्यांना तक्रारीची आठवण करून दिल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिले, तक्रारीनंतर पितळखोरा लेणीतील स्त्री शिल्पाच्या खालील नावात अर्धेच बदलून त्यात आपल्या बाजूची थोडी माहीती जोडली आहे.
खरंतर वस्तुसंग्रहालयाकडून मला तक्रारीच्या उत्तरादाखल आलेल्या ईमेलला अजून मी उत्तर दिलेले नाही पण त्यांना उत्तर देण्या आधीच त्यांनी पन्नास टक्के माहितीत बदल केला आहे.

पितळखोरा लेणीतील स्त्री शिल्प हे १०० % “गजलक्षमीचे” नाही हे संग्रहालयाच्या प्रशासनातील लोकांना ही माहीती आहे आणि मलाही, माझ्याकडे त्याचे ठोस पुरावे आहेत, माझे उत्तर जाण्या आधीच त्यांनी हे बदल केले आहेत.अनेक शतकांचे हे धार्मिक अतिक्रमण आहे, जे आपले नाही त्याला देखील कसे आपले आहे हे सांगण्यात ही मंडळी पटाईत आहेत.

खोटं बोल पण रेटून बोल

पहिले तीन फोटो हे मागच्या आठवड्यातील आहेत तर बाकीचे तक्रार करण्या आधीचे आहेत.

Dead Ambedkar is more dangerous than alive.

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments