हिमाचलमधील काँग्रेस सरकारवरचं संकट टळलं, ‘ऑपरेशन लोटस’ फेल; विक्रमादित्य यांचा राजीनामा मागे

0
10
हिमाचलमधील काँग्रेस सरकारवरचं संकट टळलं, ‘ऑपरेशन लोटस’ फेल; विक्रमादित्य यांचा राजीनामा मागे


हिमाचल मंत्रिमंडळातील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा जाहीर करताना त्यांनी आपल्या वडिलांची तुलना शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्याशी केली. पत्रकार परिषदेत वडिलांची आठवणीत विक्रमादित्य भावूक झाले. संपूर्ण निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर लढवली गेली. ज्या व्यक्तीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर २ यार्ड जमीन देण्यात आली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले होते. मात्र काँग्रेसने त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले आहे.



Source link