Gemini AI Responses On PM Modi | गुगल एआय टूलने मोदींवर दिली चुकीची प्रतिक्रिया, सरकार म्हणतयं हे तर नियमांचं उल्लंघन! आयटी राज्यमंत्र्यांनी गुगलला दिला इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
2
Gemini AI Responses On PM Modi | गुगल एआय टूलने मोदींवर दिली चुकीची प्रतिक्रिया, सरकार म्हणतयं हे तर नियमांचं उल्लंघन! आयटी राज्यमंत्र्यांनी गुगलला दिला इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित एका प्रश्नाला जेमिनीने दिलेल्या उत्तरामुळे गुगलला हा इशारा देण्यात आला आहे. राजीवच्या म्हणण्यानुसार, एआय टूल जेमिनीचे उत्तर हे आयटी नियमांचे तसेच फौजदारी संहितेच्या अनेक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुगलला त्यांच्या AI टूल जेमिनीबाबत (Gemini AI Responses On PM Modi) कडक इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संबंधित एका प्रश्नाला जेमिनीने दिलेल्या उत्तरामुळे गुगलला हा इशारा देण्यात आला आहे. राजीवच्या म्हणण्यानुसार, एआय टूल जेमिनीचे उत्तर हे आयटी नियमांचे तसेच फौजदारी संहितेच्या अनेक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांनी एका पत्रकाराच्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला, ज्यात गुगल जेमिनीने मोदींबद्दल प्रश्न विचारल्यावर अशोभनीय कमेंट केल्याचं म्हटलं आहे. मात्र, हाच प्रश्न ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्याबाबत विचारला असता, अत्यंत सावधगिरीने उत्तर देण्यात आले.’

नेमका प्रकार काय

वास्तविक, एका यूजरने गुगलच्या एआय चॅटटूल जेमिनीला विचारले होते की नरेंद्र मोदी फॅसिस्ट आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरात जेमिनी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आहेत. अशी धोरणे राबवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. काही तज्ञांनी याला फॅसिस्ट म्हटले आहे. हे आरोप अनेक पैलूंवर आधारित आहेत. यात भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचाही समावेश आहे.

गुगल जेमिनीवर पक्षपातीपणाचा आरोपही करण्यात आला आहे, कारण जेमिनीने मोदींना फॅसिस्ट म्हटले होते, तर हाच प्रश्न अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबाबत विचारला असता, त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.






Source link