Monday, August 31, 2026
Homeसाताराश्री संत रोहिदास महाराज चॅरिटेबल ट्रस्ट फलटण यांच्या संयोगाने श्री संत शिरोमणी...

श्री संत रोहिदास महाराज चॅरिटेबल ट्रस्ट फलटण यांच्या संयोगाने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती

.फलटणः येथील नवलबाई मंगल कार्यालय मारवाडा पेठे येथे  श्री संत रोहिदास महाराज चॅरिटेबल ट्रस्ट फलटण यांच्या संयोगाने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती सोहळा शनिवार दि . २४ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती प. पू .महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते व फलटण तालुक्याचे आमदार दिपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे . यावेळी श्री  संत शिरोमणी रोहिदास महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे

शनिवारी सकाळी १० ते ११.३० हळदी-कुंकू समारंभ, १०.३० ते ११.३० श्री संत रोहिदास महाराज प्रतिमेचे पूजन व आरती सोहळा होणार असून यावेळी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमही होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ वा .दरम्यान महाप्रसादाचे वाटप होणार आहे                    

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेवानिवृत्त डीवायएसपी सजन हंकारे तसेच मुंबई महानगरपालिकेचे उपप्रमुख अभियंता संजय सोनवणे, कोरेगाव कुमठेचे सरपंच संतोष चव्हाण, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास कुंभार, गणपतराव भोसले, मिलिंद नेवसे, नितीन गांधी, ज्ञानेश्वर भगत, गणेश डोईफोडे, युवा जनमतचे संपादक युवराज पवार, शशिकांत भोसले, यश खलाटे, अजय माळवे यांची प्रमुख उपस्थिता असणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments