Monday, August 31, 2026
Homeक्रीडालंच ब्रेकपर्यंत इंग्लंड पाच बाद 112 | पुढारी

लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड पाच बाद 112 | पुढारी

लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड पाच बाद 112 | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. रांचीमधील चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा मानस आहे, तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघानेही मालिका बरोबरीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs ENG 4th Test)

लंच ब्रेकपर्यंत इंग्लंड पाच बाद 112

चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात 5 गडी गमावून 112 धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आकाशने त्याच्या दुसऱ्याच षटकात जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केले. मात्र, तो चेंडू नो बॉल ठरला. यानंतर आकाशने बेन डकेटला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. डकेटने आपल्या खेळीक 11 धावा केल्या. यानंतर त्याच षटकात त्याने ऑली पोपला एलबीडब्ल्यू आऊट केले. पोप खाते उघडू शकले नाहीत. एका षटकात दोन गडी बाद झाल्याने इंग्लिश संघाला सावरता आले नाही.

12 व्या षटकात आकाशने क्रॉली क्लीन बोल्ड केले. क्रॉलीने आपल्या खेळीत 42 धावा केल्या. यानंतर अश्विनने जॉनी बेअरस्टोला तर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला.

इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत; कर्णधार बेन स्टोक्स बाद

सामन्याच्या 25 व्या षटकात कर्णधार बेन स्टोक्सच्या रूपात इंग्लंडचा पाचवा फलंदाज बाद झाला. त्याला भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने एलबीडब्ल्यू केले. स्टोक्सने आपल्या खेळीत 6 चेंडूत 3 धावांची खेळी केली.

इंग्लंडला चौथा धक्का; जॉनी बेअरस्टो बाद

इंग्लंडला 109 धावांवर चौथा धक्का बसला. अश्विनने सामन्यातील पहिली विकेट घेत जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 35 बॉलमध्ये 38 धावा करून तो बाद झाला. बेअरस्टोने जो रूटसोबत चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली होती.

आकाश दीपचा धुमधडाका; टिपले तीन बळी

इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या आकाश दीपने मैदानावर धुमधडाका केला आहे. सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 10 व्या षटकातील दुसऱ्या आणि चौथ्या बॉलवर अनुक्रमे बेन डकेट आणि ओली पोपला बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. यानंतर त्याने सामन्याच्या 12 व्या षटकात त्याने स्वताच्या बॉलवर झॅक क्रॉलीला झेलबाद केले. झॅकने आपल्या खेळीत 42 चेंडूत 42 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.

आकाश दीपचा डबल धमाका; डकेट पाठोपाठ पोपला धाडले तंबूत

आकाश दीपने इंग्लिश डावाच्या दहाव्या षटकात दुसऱ्या बॉलवर बेन डकेटला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 11 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची ही पहिली विकेट आहे. यानंतर याच षटकातील चौथ्या बॉलवर आकाश दीपने ओली पोपला एलबीडब्ल्यू केले. पोपला आपल्या खेळीत खाते ही उघडता आले नाही.

आकाश दीपचे पदार्पण

मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज आकाश दीप कसोटीमध्ये पदार्पण करत आहे. पदार्पणाची कॅप मिळवणारा तो भारताचा 313 वा खेळाडू आहे. आकाशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पदार्पणाची कॅप दिली. आकाशची आईही यावेळी उपस्थित होती. आकाशने 30 प्रथम श्रेणी सामन्यात 104 बळी घेतले आहेत. 60 धावांत सहा ही त्याची एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. (IND vs ENG 4th Test)

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेवन

भारत (प्लेइंग इलेवन) : यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेवन) : जैक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स एंडरसन.

हेही वाचा :



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments