Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi | 'जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलीये, हा आर्थिक अन्याय'; राहुल गांधी...

Rahul Gandhi | ‘जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलीये, हा आर्थिक अन्याय’; राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलीये, हा आर्थिक अन्याय’; राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

भाजप सरकारने नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले. प्रत्येक क्षेत्र काही लोकांमध्ये विभागले जात आहे.

कोरबा : भाजप सरकारने नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आला. सरकारच्या या निर्णयांमुळे छोटे व्यापारी देशोधडीला लागले. प्रत्येक क्षेत्र काही लोकांमध्ये विभागले जात आहे. सत्ता, संरक्षण, आरोग्य, रिटेल, विमानतळ देशातील कोणत्याही उद्योगात निवडक लोक असतात, याचा अर्थ संपूर्ण यंत्रणा तीन-चार लोकांसाठी चालवली जात आहे. बाकीची जनता महागाई खाली दबली गेली आहे. हा आर्थिक अन्याय असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

‘भारत जोडो न्याय’ यात्रेदरम्यान ते छत्तीसगडमधील कोरबा येथे आले असताना एका सभेला संबोधित करत होते. केंद्र सरकारवर घणाघात मागासलेले लोक, दलित आणि आदिवासी हे देशातील 74 टक्के आहेत. परंतु, या समुदायातील लोकांच्या कष्टाचा सर्व पैसा भांडवलदारांच्या कंपन्यांमध्ये जात आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये दलित आणि मागासलेले लोक नाहीत. देशातील विविध क्षेत्रात दलित आणि मागासवर्गीयांचा सहभाग नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments