Sunday, August 23, 2026
Homeसाताराराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी - जयकुमार इंगळे व शहराध्यक्षपदी प्रमोद निंबाळकर :...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी – जयकुमार इंगळे व शहराध्यक्षपदी प्रमोद निंबाळकर : श्रीमंत संजीवराजे

दि.१० – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी जयकुमार इंगळे व शहराध्यक्षपदी प्रमोद निंबाळकर (आण्णा) यांची निवड करण्यात आली आहे.

जयकुमार इंगळे हे फलटण पूर्व भागातील तरुण तडफदार कार्यकर्ते असून, या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुकाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. या कार्यकाळात युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

प्रमोद निंबाळकर हे फलटण मधील प्रख्यात बिल्डर व्यावसायिक असून शांत, संयमी व सर्व समावेशक असे व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद निंबाळकर यांची शहराध्यक्ष पदी केलेली निवड पक्षाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.

दोघांच्याही नियुक्तीनंतर विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माणचे नेते मनोज पोळ, दत्ता अनपट, राहुल निंबाळकर, दादासाहेब चोरमले, अनिल महादेव माने, फिरोज बागवान, अमोल भोईटे, तुषार नाईक निंबाळकर, राजेंद्र कापसे, बापू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments