Sunday, August 16, 2026
Homeब्लॉग" अंगकोर वट बौद्ध विहारातील " हे शिल्प आहे

” अंगकोर वट बौद्ध विहारातील ” हे शिल्प आहे

कंबोडिया इथल्या “अंगकोर वट बौध्द विहारातील” हे शिल्प आहे , अर्ध उठावातील शिल्प सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माच्या प्रसंगावर आधारित उत्कीर्ण केले आहे या शैलीला ख्मेर शिल्पकला म्हणतात इ स ११ /१२ व्या शतकातील हे शिल्प आहे, हे शिल्प सध्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय बँकॉक इथे आहे.

अर्ध उठावातील शिल्पात आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे की महामाया यांनी एका हाताने शाल वृक्षाची फांदी धरली आहे आणि डाव्या कुशीतून अलगदपणे हळूवार स्त्री सेवीका आधार देत आहे , राजकुमार सिध्दार्थ यांचा जन्म झाला आहे तर उजव्या बाजूस सर्व देव गण या मंगल प्रसंगाला समोर गेले आहे उपस्थित झाले आहेत तर तीन चेहर्‍यांचा शक्र नम्रपणे गुडघ्यावर बसून सिध्दार्थ गौतम यांना अलंकृत सोन्याच्या पात्रातून स्वीकारत आहे.
शिल्पातील सर्व पात्रांची शारीरिक ठेवण चेहर्‍यातील वैशिष्ट्यपूर्ण बारकावे हे पाश्चिमात्य जरी दिसत असले तरी हा ऐतिहासिक प्रसंग संपूर्णपणे भारतीय आहे.

सूरज रतन जगताप

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments