Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशSecurity Breach | संसदेनंतर आता गृहमंत्रालयात घुसखोरी; बनावट ओळखपत्रासह तरूणाला अटक |...

Security Breach | संसदेनंतर आता गृहमंत्रालयात घुसखोरी; बनावट ओळखपत्रासह तरूणाला अटक | Navarashtra (नवराष्ट्र)

Security Breach | संसदेनंतर आता गृहमंत्रालयात घुसखोरी; बनावट ओळखपत्रासह तरूणाला अटक | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

संसदेत तीन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कँडल फोडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दिल्लीत एका तरुणाने बनावट ओळखपत्रासह गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या तरुणास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

नवी दिल्ली : संसदेत तीन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कँडल फोडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दिल्लीत एका तरुणाने बनावट ओळखपत्रासह गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या तरुणास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. गृहमंत्रालयाची सुरक्षा भंग करण्याचा एका तरुणाचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला.

दिल्ली पोलिसांनी बनावट ओळखपत्रासह त्यास अटक केली. आदित्य प्रताप सिंग असे आरोपीचे नाव आहे. आदित्य सिंग कोणत्या उद्देशाने बनावट ओळखपत्रासह गृह मंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अद्याप या घुसखोरीमागील मुख्य उद्देश समोर आला नाही हे विशेष. दहशतवादी संबंधाचा शोध दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यालयात बनावट ओळखपत्राद्वारे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments