Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशBaghpat Case | लाक्षागृह की कब्रस्तान? कोर्टानं 53 वर्षांनी फेटाळली मुस्लीम पक्षकारांची...

Baghpat Case | लाक्षागृह की कब्रस्तान? कोर्टानं 53 वर्षांनी फेटाळली मुस्लीम पक्षकारांची याचिका | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लाक्षागृह की कब्रस्तान? कोर्टानं 53 वर्षांनी फेटाळली मुस्लीम पक्षकारांची याचिका

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील बदरुद्दीन शाह मजार (कबर) आणि लाक्षागृह वादात न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (UP) बागपत (Baghpat Case) येथील बदरुद्दीन शाह मजार (Badruddin Shah Mazar) (कबर) आणि लाक्षागृह (Lakshagriha) वादात न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे. अयोध्येतील राम मंदिरानंतर (Ayodhya Ram Mandir) सध्या कृष्णजन्मभूमी मथुरा (Krishna Janmabhoomi Mathura) व ज्ञानवापी मशीदीच्या (Gyanvapi Masjid) बाबतीत देखील न्यायालयीन प्रक्रियेने वेग घेतला आहे. दरम्यान, बागपत येथील वादावर देखील कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील वादग्रस्त जागेवर मागील 50 वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. याबाबत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी निर्णय दिला असून न्यायमूर्तींनी हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच बागपत येथील वादग्रस्त 100 बिघा (जवळपास पाच एकर) जमीन हिंदू पक्षकारांना दिली आहे. 1970 साली हा वाद समोर आला. मुकीन खान या मुस्लीम व्यक्तीने येथील लाक्षागृहास बदरुद्दीन शाह यांची कबर आणि कब्रस्तान (मुस्लीम समुदायाची स्मशानभूमी) म्हटलं होतं. मुस्लीम पक्षकारांनी या जागेवर दावा केला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments