Friday, October 9, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi : मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल; ‘एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच...

PM Narendra Modi : मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल; ‘एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच केलं जातंय…’

[ad_1]

भारतीय लोक हे आळशी आहेत… भारतीयांना कष्ट करण्याची सवय नाही… युरोप, जपान, चीन, रशिया, अमेरिका या देशांइतकी मेहनत आपण भारतीय करत नाही असं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटायचे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी लोकसभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत होते. 

१९५९ मध्ये देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नेहरू म्हणाले होते की, ‘समाजाचा विकास कसा होतो? ते मेहनतीच्या जोरावर होतो. मेहनतीतून आपला देश प्रगती करेल आणि संपत्ती निर्माण करेल. तुम्ही जगभरातील समृद्ध देशांकडे पाहा. त्यांनी ते कसे साध्य केले? हे कठोर परिश्रमातून झाले आहे.’ असं मोदी म्हणाले. 

‘भारतात लोकांना कष्ट करण्याची सवय नाही. यात आमचा दोष नाही. अशा सवयी परिस्थितीमुळे रुजलेल्या असतात. पण युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेतील लोकांइतके काम आपण करत नाही. ते देश जादूने नव्हे तर कठोर परिश्रमाने समृद्ध झाले असं समजू नका. कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे नेहरू म्हणाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments