Sunday, August 23, 2026
Homeसातारामहसूल विभागातील दोन लाचखोरांना जेरबंद ; लाचलुचपत विभागाच्या कारवाई

महसूल विभागातील दोन लाचखोरांना जेरबंद ; लाचलुचपत विभागाच्या कारवाई

वडूज : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने खटाव तालुक्यात महसूल विभागातील दोन लाचखोरांना जेरबंद केल्याने एकच खळबळ उडाली. वडूज तहसील कार्यालयात तहसिलदारांसाठी दहा हजार घेणाऱ्या महसूल सहायकास तर कातरखटावला सर्कलसाठी 25 हजार रुपये घेणाऱ्या खासगी इसमास जेरबंद करण्यात आले. विजय बाळू काळे (वय 41, महसूल सहायक, रा. बळवंत पार्क शेजारी, वडूज, मूळ रा. गुरसाळे) व खासगी इसम श्रीमंत गोविंद खाडे (वय 45, रा. एनकुळ, ता. खटाव) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. पहिल्या घटनेतील तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचे वाटपपत्र करून मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर काळे याने वाटप पत्र आदेश करून देतो असे म्हणून स्वतःसाठी व तहसीलदार वडूज यांच्यासाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती 10 हजार रुपये राच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काळे याला रंगेहात पकडले. या कारवाईत निरीक्षक विक्रम पवार, हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, कॉन्स्टेबल विक्रमसिंह वाघमारे यांनी केली. दुसऱ्या घटनेतील तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचे व घराचे वाटणीपत्रक करून सातबारा उतारा नोंदीकरिता 25 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रुपयांची लाच मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय, कातरखटाव येथे स्वीकारताना श्रीमंत खाडे याला रंगेहात पकडले. या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन राऊत, नाईक गणेश ताटे, कॉ. नीलेश येवले यांनी भाग घेतला. दोन्ही कारवाया, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या. या घटनेमुळे खटाव तालुक्याच्या महसूल विभागातील खाबूगिरी समोर आली असून प्रतिक्रियेसाठी तहसीलदार बाई माने यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. यातील बडे मासे गळाला लागणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments