Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशHaridwar Crime Case | कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला आईनेच...

Haridwar Crime Case | कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला आईनेच गंगेत बुडवलं; मुलाचा दुर्दैवी मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

Haridwar Crime Case | कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला आईनेच गंगेत बुडवलं; मुलाचा दुर्दैवी मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला आईनेच गंगेत बुडवलं; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलाला आईने गंगेमध्ये बुडवले आणि त्यामध्ये मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

हरिद्वार : विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगामध्ये देखील अंधश्रद्धेवर (Superstitions) विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत. यामधून देशभरामध्ये अनेक लोकांचा हाकनाक बळी देखील जात असतो. अशीच धक्कादायक घटना हरिद्वारमधून (Haridwar) समोर आली आहे. आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलाला आईने गंगेमध्ये बुडवले आणि त्यामध्ये मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला (Haridwar Crime Case) आहे. या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.

हरिद्वारमध्ये गंगा स्नान (Ganga Snan) करणे अगदी साहजिक मानले जाते. एका आई आपल्या मुलासह गंगास्नानसाठी घाटावर उतरली. लोकांना सुरुवातीला गंगास्नान करत असल्याचे वाटले मात्र खूप वेळानंतर देखील मुलाला नदीबाहेर न काढता त्याला बुडवून ठेवत असल्यामुळे लोकांनी त्या महिलेला विचारणा करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments