Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशAyodhya Ram Temple inauguration | रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील मुख्य कलाकाराचे...

Ayodhya Ram Temple inauguration | रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील मुख्य कलाकाराचे अयोध्येत धुमधडाक्यात स्वागत; व्हिडिओ झाला व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

Ayodhya Ram Temple inauguration | रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील मुख्य कलाकाराचे अयोध्येत धुमधडाक्यात स्वागत; व्हिडिओ झाला व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील मुख्य कलाकाराचे अयोध्येत धुमधडाक्यात स्वागत; व्हिडिओ झाला व्हायरल

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना देखील या मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्याची अयोध्येमध्ये येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ayodhya Ram Temple inauguration) सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. या सोहळ्याची देशभरामध्ये तयारी सुरु झाली असून अयोध्या नगरी देखील सजली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळजवळ 8 हजार पाहुण्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पडद्यावर प्रभू श्री रामांचा (Parbhu Shree Ram) जीवनपट जीवंतपणे मांडणारे रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या ‘रामायण’ मालिकेतील (Ramayan serial) कलाकारांना देखील या मंदिर उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्याची अयोध्येमध्ये येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

जुन्या काळातील लोकप्रिय मालिका आणि ज्या मालिकेतील लोकांच्या मनावर राज्य केले अशी रामानंद सागर यांची रामायण मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी आपल्या जीवंत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले. आजही प्रभू राम साकारणारे अरुण गोविल, सिता साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) आणि लक्ष्मणाची व्यक्तीरेखा साकारणारे सुनील लहरी (Sunil Lahri) यांची पुजा करणारे अनेक लोक आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी हे तीनही कलाकार अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. या तीन कलाकारांचे अयोध्येमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्याभोवती नृत्य देखील सादर करण्यात आले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments