Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशBlast at Israeli Embassy | गर्दीच्या ठिकाणांवर जाणं टाळा,दिल्ली स्फोटानंतर इस्रायलने आपल्या...

Blast at Israeli Embassy | गर्दीच्या ठिकाणांवर जाणं टाळा,दिल्ली स्फोटानंतर इस्रायलने आपल्या नागरिकांना सावधानतेचा दिला इशारा! | Navarashtra (नवराष्ट्र)

Blast at Israeli Embassy | गर्दीच्या ठिकाणांवर जाणं टाळा,दिल्ली स्फोटानंतर इस्रायलने आपल्या नागरिकांना सावधानतेचा दिला इशारा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गर्दीच्या ठिकाणांवर जाणं टाळा,दिल्ली स्फोटानंतर इस्रायलने आपल्या नागरिकांना सावधानतेचा दिला इशारा!

इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या स्फोटाचे वर्णन संभाव्य ‘हल्ला’ म्हणून केलं आहे. भारतात राहणाऱ्या इस्रायली नागरिकांनी मॉल्स, मार्केट किंवा अशा ठिकाणी जाणे टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : मंगळवारी नवी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर (Blast at Israeli Embassy) इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने भारतातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी भारतातील त्यांच्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तपासादरम्यान घटनास्थळावरून एक पत्र सापडल्याचे वृत्त आहे, जे इस्रायलच्या राजदूतासाठी लिहिले होते.

हे सुद्धा वाचा

इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने काय म्हण्टलं

इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या स्फोटाचे वर्णन संभाव्य ‘हल्ला’ म्हणून केले आहे. भारतात राहणाऱ्या इस्रायली नागरिकांनी मॉल्स, मार्केट किंवा पाश्चात्य किंवा ज्यू लोक भेट देतात अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेस्टॉरंट, हॉटेल आणि बारमध्ये इस्रायली नागरिकांनी सावध राहावे, असेही सांगण्यात आले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments