
president approves three criminal bills crpc ipc : भारतातील ब्रिटिश राजवटीचे प्रतीक असलेल्या अनेक गोष्टी मोदी सरकार बदलत आहेत. भारतीय राज्य घटनेत ब्रिटिशकालीन कायदे असलेले तीन कायदे देखील रद्द करण्यात आले असून त्यांच्या एवजी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीन नवीन फौजदारी विधेयकांना मंजुरी दिली आहे. भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संहिता आणि भारतीय सक्षम कायदा यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आता हे तीन कायदे भारतीय दंड संहिता (IPC), भारतीय फौजदारी प्रक्रिया (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा ८७२ ची जागा घेतील. यापूर्वी हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ही विधेयके संसदेत नव्याने मांडण्यात आली होती.







