Very Clean Airport | बंगळुरू विमानतळ जगात सर्वांत सुंदर; युनेस्कोकडून जागतिक पुरस्कार जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
6
Very Clean Airport | बंगळुरू विमानतळ जगात सर्वांत सुंदर; युनेस्कोकडून जागतिक पुरस्कार जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)


केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 ने (टी 2) जगातील सर्वांत सुंदर विमानतळांपैकी एक’ म्हणून ओळख मिळवली आहे. त्याला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्सायद्वारे ‘इंटिरिअर 2023 साठी जागतिक विशेष पुरस्कार’ प्रदान केला आहे.

बंगळुरू : येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 ने (टी 2) जगातील सर्वांत सुंदर विमानतळांपैकी एक’ म्हणून ओळख मिळवली आहे. त्याला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्सायद्वारे ‘इंटिरिअर 2023 साठी जागतिक विशेष पुरस्कार’ प्रदान केला आहे. ही मान्यता मिळवणारे हे एकमेव भारतीय विमानतळ आहे, असे बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

2015 मध्ये स्थापित प्रिक्स व्हर्साय संस्थेने नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता स्थानिक वारशाचे प्रतिबिंब, पर्यावरणीय कार्यक्षमता आणि सामाजिक परस्परसंवादाची मूल्ये या विमानतळवर जपली आहेत, असे म्हटले आहे. 2 लाख 55 हजार 661 चौरस मीटरमध्ये हे टर्मिनल चार खांबांवर उभारले गेले आहे. 11 नोव्हेंबर 2022 रोजी उद्घाटन झालेल्या टर्मिनल-2 चा पहिला टप्पा दरवर्षी 25 दशलक्ष प्रवाशांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेला आहे, असे त्यात म्हटले आहे.






Source link