Narendra Modi On Article 370 | ‘विश्वातील कोणतीही शक्ती आता कलम 370 परत आणू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Narendra Modi On Article 370 | ‘विश्वातील कोणतीही शक्ती आता कलम 370 परत आणू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत! | Navarashtra (नवराष्ट्र)


‘विश्वातील कोणतीही शक्ती आता कलम 370 परत आणू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत!

एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नंरेद्र मोदींनी आर्टिकल 370 बद्दल वक्तव्य केलं आहे. आता विश्वातील कोणतीही शक्ती आर्टिकल 370 परत आणू शकत नाही असं त्यांनी म्हण्टलं आहे.

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमधून आर्टिकल 370 (Article 370)हटवण्याचा निर्णय योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court)नुकतचं म्हण्टलं आहे. यावरुन अजूनही मत मातंतर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक वक्तव्य केलं आहे. आता ‘विश्वातील कोणतीही शक्ती कलम 370 परत आणू शकत नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. यासोबत त्यांनी पंतप्रधानांनी संसदेत घडलेल्या घटना चिंताजनक असल्याचंही म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

नुकतंच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय  महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेनं जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केला आणि राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख (Ladakh) असे दोन भाग केले आणि दोन्ही केंद्रशासित प्रदेश (Indian Union Territory) म्हणून घोषित केलं. या बाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने पुष्टी केली आहे की देशात दोन कायदे चालू शकत नाहीत. जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी 370 हटवणे आवश्यक होते. जनतेच्या विकासासाठी हे आवश्यक होते. 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा चेहरामोहरा बदलला आहे. आता तिथे सिनेमा हॉल सुरू आहेत. इथे दहशतवादी होते, तिथे आता पर्यटकांची जत्रा आहे. ज्या ठिकाणी दगडफेक होत असे तेथे चित्रपटांचे चित्रीकरण केले जात आहे. जे राजकीय स्वार्थापोटी कलम 370 बद्दल संभ्रम पसरवत आहेत, त्यांना मी स्पष्टपणे सांगेन, ‘आता विश्वातील कोणतीही शक्ती कलम 370 परत आणू शकत नाही.’






Source link