
Ramdular Gond Sentenced to 25 Years In Prison: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील दुधी मतदारसंघातील भाजप आमदार रामदुलार गोंडला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. रामदुलार गोंडला न्यायालयाने २५ वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम पीडितेला दिली जाणार आहे. सोनभद्रच्या खासदार-आमदार न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, नोव्हेंबर २०१४ मध्ये महापौरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आठ वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर निकाल समोर आला.








