
Nagpur Pachpaoli Accident: नागपूरच्या पांचपावली पुलावर भीषण अपघात झाला. टेम्पोच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर टेम्पोचालक फरार आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.








