Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशमध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, घाईघाईत पळाला प्रियकर; सकाळी गच्चीवर आढळला मृतदेह

मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, घाईघाईत पळाला प्रियकर; सकाळी गच्चीवर आढळला मृतदेह

मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, घाईघाईत पळाला प्रियकर; सकाळी गच्चीवर आढळला मृतदेह

[ad_1]

Ghaziabad Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. 

गाझियाबादच्या साहिबााबाद कोतवाली भागात ही घटना घडली. कोतवाली परिसरातील श्याम पार्क येथील पाच मजली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेचे शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय भास्करसोबत प्रेमसंबंध होते. महिलेचे लग्न झाले आहे. बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या भास्करचे अद्याप लग्न झालेले नव्हते. साहिबााबादमधील 12 मजली अपार्टमेंटमध्ये फक्त चार कुटुंबे राहतात

ज्या अपार्टमेंटमध्ये भास्कर त्याच्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. ती 12 मजली उंच आहे. मात्र येथे फक्त चार फ्लॅटमध्ये लोक राहतात. भास्कर मैत्रिणीला भेटण्यासाठी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गेला होता. दरम्यान, रात्री साडे अकराच्या सुमारास महिलेचा पती आला. यामुळे भास्कर किचन राफ्टरमध्ये बसवलेल्या पाईपच्या सहाय्याने अपार्टमेंटच्या छतावर चढला. 

येथे तो पीएनजी पाइपला धरून पाण्याच्या टाकीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर पीएनजीचा पाइप तुटून तो शेजारच्या घराच्या छतावर पडला. हेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरल्याचे सांगण्यात येत आहे. 

भास्कर आई आणि वडीलांसोबत राहतो. त्याची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. भास्कर दिल्ली येथून तिच्यावर उपचार घेत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भास्करची या महिलेशी मैत्री झाली, अशी माहिती साहिबााबाद पोलिस स्टेशनचे प्रभारी अजय कुमार यांनी दिली. 

भास्करने मैत्रिणीला भेटायला जाण्यापूर्वी येथून सिगारेटचा बॉक्स घेतला होता, अशी माहिती अपार्टमेंटजवळील दुकानदाराने पोलिसांना दिली. या माहितीच्याआधारे  पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. असे असताना भास्करचा मृत्यू पडल्याने झाला की त्याचा खून झाला? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments