
[ad_1]
झोया अख्तरचा ‘द आर्चिज’ हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकारांसाठी मंगळवारी रात्री एक विशेष प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कतरिना कैफ, जुही चावला आणि अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण, या सोहळ्यात शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या लेकीच्या पहिल्या चित्रपटासाठी पूर्ण खान परिवार उत्सुक होता. मात्र, या सोहळ्यात सुहानापेक्षा शाहरुखच्या लेकाची म्हणजे अबरामचीच जास्त चर्चा पाहायला मिळाली आहे. या प्रिमिअरसाठी सुहानाने ग्लिटरी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर, शाहरुख खानने ‘द आर्चिज’चा प्रमोशनल टी-शर्ट घातलेला दिसत होता. तर, अबरामने देखील त्याच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
[ad_2]
Source link
