Dinesh Phadnis Death: ‘सीआयडी’ मालिकेतील ‘फ्रेडी’चं निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

0
22
Dinesh Phadnis Death: ‘सीआयडी’ मालिकेतील ‘फ्रेडी’चं निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी


हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अभिनेता दिनेश फडणीस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. मात्र, ‘सीआयडी’ मालिकेतील दिनेश यांचे सहकलाकार अभिनेते दयानंद शेट्टी यांनी हे वृत्त नाकारले होते. यावेळी दिनेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे, दया यांनी सांगितले होते. अभिनेते दिनेश फडणीस हे मृत्यूशी झुंज देत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. यानंतर त्यांना नेमकं काय झालं होतं याचा खुलासा करताना दयानंद शेट्टी म्हणाले की, त्यांचे यकृत निकामी झाले होते. यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, डॉक्टरांचे सगळे प्रयत्न आता निष्फळ ठरले आहेत.



Source link