International Emmy Awards 2023 : विनोदवीर वीर दासने एमी पुरस्कारावर कोरलं नाव

0
14
International Emmy Awards 2023 : विनोदवीर वीर दासने एमी पुरस्कारावर कोरलं नाव


अंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार या अधिकृत एक्स अकाऊंटवर वीर दासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली. त्याला नेटफ्लिक्सवरील ‘वीर दास लँडिंग’ या कार्यक्रमासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. वीर दासने अंतराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव मोठे केल्यामुळे सर्वांना अभिमान वाटत आहे. वीर दाससोबत या शर्यतीत फ्रान्सचा फ्लैम्ब्यू, अर्जेंटीनाचा एल एनकारगाडो आणि यूकेच्या ‘डेरी गर्ल्स सीझन 3’चा समावेश होता. आता वीर दासला पुरस्कार मिळाल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.



Source link