
[ad_1]
शिंदे गटातील कार्यकर्त्या आणि समाजसेविका दिपिका दिगंबर तावडे यांनी शनिवारी अंधेरी पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी संध्याकाळी फेसबूक पाहत असतानाएका वृत्तपत्राच्या बेवसाईटने शेअर केलेल्या बातमीच्या खाली ठाकरे गटाचे कार्यकर्ते हेमंत पालवे यांनी आक्षेपार्ह कमेंट केली. सदर कमेंट वाचत असताना माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली. तसेच हा मजकुर सोशल सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आमच्या येथील अनेक महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.
[ad_2]
Source link
