Uttarkashi tunnel accident | गेल्या 24 तासापासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी बचाव कार्य सुरू, छिद्रातून दिलं जातयं ऑक्सिजन, पाईपमधून अन्न.. | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Uttarkashi tunnel accident  | गेल्या 24 तासापासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी बचाव कार्य सुरू, छिद्रातून दिलं जातयं ऑक्सिजन, पाईपमधून अन्न.. | Navarashtra (नवराष्ट्र)


गेल्या 24 तासापासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी बचाव कार्य सुरू,  छिद्रातून दिलं जातयं ऑक्सिजन, पाईपमधून अन्न..

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्क्यरा येथे निर्माणाधीन बोगदा कोसळल्याने अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. येथे कंप्रेसरद्वारे दाब निर्माण करून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाइपलाइनद्वारे अन्न पाठवले जात आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarkashi) ऐन दिवाळीच्या दिवशी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा काही भाग पहाटे अचानक फुटला, त्यामुळे त्यात काम करणारे सुमारे 40 कामगार आत अडकले. या दुर्घटनेला २४ तासांहून अधिक काळ लोटला असून,सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ढिगारा हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. बचाव पथकाकडून बोगद्याचा ढिगारा हटवण्यात येत आहे. आतापर्यंत ६० मीटरपर्यंतचा ढिगारा हटवण्यात आला असून ३० ते ३५ मीटरचा ढिगारा शिल्लक आहे.

हे सुद्धा वाचा

पाईपद्वारे पाठवला जात आहे ऑक्सिजन

ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. सध्या सर्व कामगार सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्यात पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या पाइपलाइनमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या पाइपलाइनद्वारे कंप्रेसरद्वारे दाब निर्माण करून रात्री बोगद्यात अडकलेल्या कामगारांना हरभऱ्याची पाकिटे पाठवण्यात आली आहेत.






Source link