Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशUttarkashi tunnel Accident | ऐन दिवाळीच्या दिवशी उत्तराखंडवर संकट; उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन...

Uttarkashi tunnel Accident | ऐन दिवाळीच्या दिवशी उत्तराखंडवर संकट; उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा तुटला, 40 हून अधिक कामगार आत अडकले | Navarashtra (नवराष्ट्र)

Uttarkashi tunnel Accident  | ऐन दिवाळीच्या दिवशी उत्तराखंडवर संकट; उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा तुटला, 40 हून अधिक कामगार आत अडकले | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ऐन दिवाळीच्या दिवशी उत्तराखंडवर संकट; उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगदा तुटला, 40 हून अधिक कामगार आत अडकले

उत्तराखंडमध्ये निर्माणाधीन बोगदा कोसळल्याने सुमारे 20-25 कामगार अडकले आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा येथे 200 मीटरपर्यंत ढिगारा पडला आहे. त्यात 800 मीटर अंतरावर कामगार अडकले आहेत.

देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह पाहायला मिळत आहे. सगळीकडे उत्साहाचं वातवरण असताना उत्तराखंडवर मधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन बोगदा कोसळून अपघात (Uttarkashi tunnel Accident) झाला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळले आहे. या अपघातामुळे बोगद्यात काम करणारे सुमारे ४० कामगार अडकले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

कसा घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा ते दंडलगाव या मार्गावर  बोगद्यातं बांधकाम सुरू आहे. रविवारी पहाटे चारच्या सुमारास बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बोगदा कोसळल्यानंतर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफचे बचाव पथक रवाना करण्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेल्या सुमारे ४० मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments