pakistan releases 80 indian fishermen | पाकिस्तानने भारताला दिली दिवाळी भेट, तुरुंगात डांबलेल्या 80 मच्छिमारांची सुटका! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
55
pakistan releases 80 indian fishermen  | पाकिस्तानने भारताला दिली दिवाळी भेट, तुरुंगात डांबलेल्या 80 मच्छिमारांची सुटका! | Navarashtra (नवराष्ट्र)


पाकिस्तानने भारताला दिली दिवाळी भेट, तुरुंगात डांबलेल्या 80 मच्छिमारांची सुटका!

पाकिस्तानने आपल्या तुरुंगात बंद असलेल्या 80 भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. वादळाच्या वेळी ते चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानी पाण्यात गेले.

देशभरात दिवाळी (Diwali 2023) निमित्त चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. या उत्सवाच्या वातारणाचा आंनद द्विगुणित करण्यासाठी दिवाळीनिमित्त पाकिस्तानने भारताला अनोखी भेट दिली आहे. पाकिस्तानने आपल्या तुरुंगात कैद असलेल्या 80 भारतीय मच्छिमारांची सुटका (pakistan releases 80 indian fishermen ) केली आहे. वादळाच्या वेळी हे मच्छिमार चुकून पाकिस्तानत गेले होते.

हे सुद्धा वाचा

पंजाबमधील अमृतसर येथील अटारी-वाघा सीमेवर सर्व 80 मच्छिमारांचे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले. पाकिस्तानने सोडलेल्या मच्छिमारांनी आपली परीक्षा कथन केली आहे. यासोबतच पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या अन्य 184 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचे आवाहनही भारत सरकारला करण्यात आले आहे.






Source link