Earthquakes In Iceland | आइसलँडमध्ये 14 तासांच्या आत 800 भूकंप; आणीबाणी जाहीर, ज्वालामुखीचा होऊ शकतो विस्फोट! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Earthquakes In Iceland | आइसलँडमध्ये 14 तासांच्या आत 800 भूकंप; आणीबाणी जाहीर, ज्वालामुखीचा होऊ शकतो विस्फोट! | Navarashtra (नवराष्ट्र)


आइसलँडमध्ये 14 तासांच्या आत 800 भूकंप; आणीबाणी जाहीर, ज्वालामुखीचा होऊ शकतो विस्फोट!

भूकंपामुळे आइसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यताही वाढली आहे.

आइसलँडमध्ये 14 तासांत 800 भूकंप (Earthquakes In Iceland) झाले आहेत. शक्तिशाली भूकंपांच्या मालिकेनंतर दक्षिण-पश्चिम रेकजेनेस द्वीपकल्पात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे  शुक्रवारी आणीबाणी जाहीर करण्यात आली  आहे. मात्र, या भुकंपासोबत देशावर आणखी एक संकट घोंघावत आहे. या भूकंपामुळे लवकरच मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत असल्याचं बोललं जात आहे.

हे सुद्धा वाचा

नागरी संरक्षण आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कळवले की राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी ग्रिन्दाविकच्या उत्तरेकडील सुंदनजुक्कगीर येथे भूकंपामुळे आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. आगामी काळात पूर्वीपेक्षा अधिक तीव्र भूकंप होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. पाच किलोमीटर खोलीवर मॅग्मा जमा होत आह






Source link